नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल 2021) सर्व सहा संघांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) ही स्पर्धा हस्तांतरित करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पत्र लिहिले आहे. पाकिस्तानमध्ये वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अंशतः लॉकडाऊन होण्याचीही चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान सुपर लीगच्या आयोजनावर शंका आहे.
ईएसपीएनच्या अहवालानुसार पीएसएलच्या संघांनी पीसीबीला स्पर्धा पाकिस्तानमध्ये हस्तांतरित करण्यासाठी पत्र लिहिले आहे. पीसीबी या प्रस्तावाचा आढावा घेत आहे आणि लवकरच याबाबत निर्णय घेईल. खेळाडू आणि अधिकार्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे पीसीबीला 4 मार्चला लीगचा सहावा हंगाम थांबवावा लागला. यानंतर लीगचे 34 पैकी केवळ 10 सामने खेळले गेले. 1 जूनपासून ही स्पर्धा पुन्हा सुरू होणार आहे. लीग स्टेज सामने 14 जूनपर्यंत चालतील आणि प्लेऑफ सामने 16 जूनपासून सुरू होतील.
20 जून रोजी अंतिम सामन्यासह ही स्पर्धा संपेल. ही स्पर्धा लवकरच यूएईमध्ये हलविण्याबाबत पीसीबीला निर्णय घ्यावा लागेल, अशी शक्यता दिसत आहे.
Check Also
‘नैना’साठी शेतकर्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका
आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्या मुंबईच्या अनुषंगाने नैना …