Breaking News

टी-20 लीगसाठी करार करण्यापूर्वी गृहपाठ करा

‘एसीए’ने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना झापले

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

भारतात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात अडकून पडलेत. 15 मेपर्यंत भारतातील विमान वाहतुकीवर ऑस्ट्रेलियन सरकारने बंदी घातलीय. त्यामुळे ऑसी खेळाडू आता मालदिव किंवा श्रीलंकेत आसर्‍याच्या शोधात आहेत. त्याच वेळी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी टॉड ग्रीनबर्ग यांनी खेळाडूंना झापले आहे. यापुढे परदेशात टी-20 लीग खेळण्यासाठीचा करार करताना गृहपाठ करा, असा सल्ला देताना त्यांनी खेळाडूंचे कान टोचले.

खेळाडू, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक आणि समालोचक असे जवळपास 40 जण भारतात अडकले आहेत. ग्रीनबर्ग यांनी सांगितले की, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा सेंट्रल करार, राज्यांचा करार आणि फ्रिलान्सर असे करार असलेले खेळाडू परदेशात विविध लीगमध्ये खेळत आहेत. या सर्वांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून ना हरकत प्रमाणपत्र लागते, परंतु खेळाडू त्यांचा निर्णय स्वतः घेतात.

ख्रिस लीन, डॅन ख्रिस्टीयन व बेन कटींग यांनी या वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळताना नियम मोडले होते. जोश हेझलवूड, मिचेल मार्श आणि जोश फिलीप यांनी बायो बबलला कंटाळून आयपीएलमधून माघार घेतली. त्यानंतर अँड्र्यू टाय, केन रिचर्डसन आणि अ‍ॅडम झम्पा हे भारतातील कोरोना परिस्थिती बिघडताना पाहून मायदेशात परतले. भविष्यात परदेशात लीग खेळताना अभ्यास केल्याचा फायदा खेळाडूंना नक्की होईल. कोरोनामुळे आपल्या डोळ्यांदेखत जग बदलत चालले आहे. त्यामुळे खेळाडूंनी गृहपाठ करायला हवा, असे ग्रीनबर्ग म्हणाले.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply