Breaking News

आकुळवाडीजवळ रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू

मोहोपाडा : प्रतिनिधी

कराडे खुर्द येथील संतोष रामचंद्र दाभणे (वय 45) यांचा रेल्वे अपघातात गंभीर मृत्यू झाला असल्याने कराडे गावात शोककळा पसरली आहे.

याबाबत रसायनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपटाजवळ मौजे आकुळवाडी येथील पेण ते पनवेल रेल्वे टॅकवरील स्टोन नंबर 80/21 ते 80/23 चे दरम्यान पेण बाजूकडून पनवेल बाजूकडे जाणार्‍या रेल्वेची धडक लागून संतोष रामचंद्र दाभणे (वय 45) यांच्या डोक्यास व शरीरास गंभीर दुखापती होवून अपघातात संतोष दाभणे जागेवर गतप्राण झाले.

याबाबत त्यांचा मुलगा साहिल संतोष दाभणे यांनी रसायनी पोलिसांना माहिती दिली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्वनाथ बप्पाजी खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनाजी काळे तपासिक अंमलदार म्हामुणकर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मयत संतोष दाभणे यांचे शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत रसायनी पोलीस अधिक तपास करीत असून याबाबत पोलीस ठाण्यात सीआरपीसी 174 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply