Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कोविड केअर सेंटरचे उद्घाटन  

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असून, रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर वहाळ येथे डॉ. राहुल वंजारी, डॉ. दीपाली गोडघाटे यांनी एकायन हॉस्पिटल कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या सेंटरचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 7) उद्घाटन करण्यात आले.  
या कार्यक्रमास तहसीलदार विजय तळेकर, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेंद्र पाटील, भाजप नेते संदीप पाटील, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, तसेच अंकुश ठाकूर, वहाळ तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सीताराम नाईक, रमेश दापोलकर, वहाळ ग्रामपंचायत सदस्य चेतन घरत, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, डॉ. राहुल वंजारी, डॉ. दीपाली गोडघाटे, पोलीस अधिकारी इंगळे आदी उपस्थित होते.
पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून, रुग्णांना बेड मिळण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. उपचाराअभावी अनेक रुग्णांचा कोरोना विषाणूमुळे बळीही गेला आहे. कोरोनाची वाढती महामारी लक्षात घेता डॉ. राहुल वंजारी आणि डॉ. दीपाली गोडघाटे यांनी पनवेल तालुक्यातील वहाळ येथे एकायन हॉस्पिटल कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. त्यामुळे परिसरातील रुग्णांना उपचार मिळणे सुलभ होणार आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply