पनवेल ः रामप्रहर वृत्त
कष्टकर्यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 33व्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी (दि. 7) मान्यवरांनी अभिवादन केले. कोरोनाविषयक नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने हा कार्यक्रम झाला.
जनार्दन भगत साहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट आहे. त्यांनी अहोरात्र जनतेची सेवा केली. आयुष्यापेक्षा ध्येय मोठे असले पाहिजे, अशी शिकवण त्यांनी समाजात रूजवली. अशा महापुरुषाला पुण्यतिथीनिमित्त ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाइस चेअरमन वाय. टी. देशमुख यांच्यासह कुटुंबीयांनी भगत साहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper