Breaking News

पनवेल महानगरपालिका पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

भाजपच्या रूचिता लोंढे यांना अनुकूल वातावरण

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेच्या नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक 19 ‘ब’मध्ये गुरुवारी (दि. 9) मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. दरम्यान, भाजप-रिपाइं युतीच्या उमेदवार रूचिता लोंढे यांना या पोटनिवडणुकीत अनुकूल वातावरण दिसून येत आहे.
प्रभाग क्रमांक 19 ‘ब’मध्ये जवळपास 28,350 मतदारांची नोंद झाली आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेतील मतदान प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी प्रशासनाने 240 कर्मचार्‍यांची नेमणूक केली आहे. 34 मतदान केंद्रांवर प्रत्येकी पाच कर्मचारी व एक पोलीस असणार आहे. प्रभागातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी किंवा दोन तासांची सवलत देण्यात यावी, असे आदेश राज्य शासनातर्फे देण्यात आले आहेत.  
 भाजप नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी बिनविरोध निवडणूक होईल अशी अपेक्षा असतानाच महाआघाडीकडून अनपेक्षितरीत्या उमेदवार देण्यात येऊन त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. असे असले तरी भाजपकडून भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली असून, भेटीगाठी, रॅली, कॉर्नर सभा, सायकल, रिक्षा अशा माध्यमातून प्रचारावर भर देण्यात आला आहे. भाजप युतीच्या प्रचारास मतदारांनी उत्तम प्रतिसाद दिला असल्याने रूचिता लोंढे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply