Breaking News

राज्यात 18 ते 44 वयोगटाच्या टप्प्यातही वयानुसार पडणार गट

लसीकरणाबाबत आरोग्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई ः प्रतिनिधी
देशभरात 1 मेपासून 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरणाच्या तिसर्‍या टप्प्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. त्यानुसार लसींच्या उपलब्धतेनुसार काही राज्यांनी हे लसीकरण सुरू केले. महाराष्ट्रातदेखील त्याची मोजक्या केंद्रांवर सुरुवात करण्यात आली, मात्र केंद्रांवर गोंधळ उडत असल्याने आता राज्य सरकार 18 ते 44 या वयोगटासाठीच्या लसीकरणाच्या तिसर्‍या टप्प्यामध्ये वेगवेगळे स्लॉट करून त्यानुसार लसीकरण करण्याची शक्यता आहे. हे स्लॉट वयोगट किंवा सहव्याधी यानुसार असू शकतात, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. ते शुक्रवारी (दि. 7) पत्रकार परिषदेत बोलत होते.
18 ते 44 वयोगटासाठीच्या लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. शिवाय या वयोगटासाठी ग्रामीण भागातील केंद्रांवर त्याच भागातील लोक न जाता मेट्रो शहरांमधून ज्यांना तंत्रज्ञानाची जाण आहे अशा लोकांनी कोविन अ‍ॅपवर नोंदणी करून केंद्रांवर जाऊन लसीकरण करून घेतले. त्यामुळे स्थानिक भागात अस्वस्थता निर्माण झाली. ही समस्या सोडवण्यासाठी लस मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला स्लॉट द्यावे लागणार आहेत. मग वयोगटाचा किंवा कोमॉर्बिडिटीचा स्लॉट देता येईल. म्हणून 35 ते 44 या वयोगटातल्या लोकांना प्राधान्य देता येईल का? त्यातही सहव्याधी असलेल्यांना अधिक प्राधान्य देता येऊ शकेल का, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाणार आहे, असे टोपे म्हणाले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply