Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून महापौर निधीसाठी 25 लाख रुपयांची मदत जाहीर

पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यातील दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून कोरोना महामारीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक गरजूंना मदत करण्यात आली. त्यांचे सेवाकार्य सुरूच असून, महापौर निधीसाठी त्यांनी 25 लाख रुपये देण्याचे शनिवारी (दि. 8) जाहीर केले. हा निधी येत्या सोमवारी सुपूर्द करण्यात येणार आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना वैद्यकीय कारणांसाठी तसेच अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या कारणास्तव पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी लोकसहभागातून महापौर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीमधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरजूंना कोविड-19, हृदयरोग, मेंदू संबंधित उपचार तसेच शस्त्रक्रिया, कॅन्सर संबंधित शस्त्रक्रिया, ल्युकेमिया, थॅलेसीमिया, क्षयरोग, अवयव प्रत्यारोपण, डायलिसिस, बोनमॅरो यांसारख्या गंभीर आजारांसाठी आर्थिक मदत करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आपत्तीग्रस्तांना, अपघातामुळे मृत्यू किंवा कायमस्वरूपी दुखापत, कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्यांना आर्थिक मदत करण्यात येईल.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply