पनवेल ः रामप्रहर वृत्त
भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते देवचंद बहिरा, युवा मोर्चाचे जिल्हा संघटक प्रतिक बहिरा आणि भारतीय जनता पक्ष तक्का विभागीय कमिटीच्या वतीने रिक्षाचालक, घरकाम करणार्या महिला, भाजी व मच्छी विक्रेते अशा 227 कुटूंबांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले.
या किट वाटपावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, संदीप बहिरा, प्रभाग 20चे अध्यक्ष रघुनाथ बहिरा, युवा नेते प्रतिक बहिरा, जितू खुटकर, अतुल बहिरा, संदीप पगडे, जयदास कावळे, स्वरूप मुंबईकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरोना वैश्विक महामारी आणि पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या परिस्थितीत रिक्षाचालक, भाजी व मच्छी विक्रेते, घरकाम करणार्या महिलांना अशा हातावर पोट असणार्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे त्यांना थोडाबहुत आधार देण्याच्या दृष्टिकोनातून भाजपकडून रेशन किट देण्यात आले. याबद्दल त्यांनी भाजपचे आभार मानले.
Check Also
पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper