Breaking News

जागतिक ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा : कुस्तीपटू सीमाला सुवर्णपदक

इक्वाडोर : वृत्तसंस्था

टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली भारताची कुस्तीपटू सीमा बिस्लाने जागतिक ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेत महिलांच्या 50 किलो वजनी गटात सुवर्णपदकावर नाव कोरले. इक्वाडोरच्या लुसिया गुझमनने दुखापतीमुळे अंतिम फेरीतून माघार घेतल्याने 29 वर्षीय सीमाला विजयी घोषित करण्यात आले. 2019मध्ये सीमाने यासार दोगू स्पर्धेत अखेरचे सुवर्णपदक जिंकले होते. जागतिक ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेमधील ग्रीको-रोमन प्रकारात शनिवारी भारताची पाटी कोरी राहिली. त्यामुळे एकाही मल्लाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी स्थान निश्चित करता आली नाही. भारताला गुरप्रीत सिंगकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र 77 किलो वजनी गटाच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात त्याचे आव्हान संपुष्टात आले. युरोपियन विजेत्या रफिग हुसेयनोव्हने (अझरबैजान) त्याचा 48 सेकंदांत पराभव केला. हुसेयनोव्हने सुरुवातीलाच चार गुण मिळवले. त्यानंतर गुरप्रीत सावरण्याच्या आताच त्याने आणखी चार गुणांची कमाई करीत पहिल्याच सत्रात सामना जिंकला. गेल्या महिन्यात आशियाई पात्रता कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक मिळवणार्‍या गुरप्रीतला पहिल्याच लढतीत पुढे चाल मिळाली होती.

माद्रिद ओपनमध्ये ज्वेरेवची नदालवर मात

माद्रिद : वृत्तसंस्था

फ्रेंच ओपन टेनिसच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण स्पर्धा मानल्या जाणार्‍या माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेत ‘लाल मातीचा बादशहा’ अशी ख्याती असलेला स्पेनचा दिग्गज राफेल नदाल उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पराभूत झाला. 13 वेळेचा चॅम्पियन नदालला सहावा मानांकित अलेक्झांडर ज्वेरेव याने 6-4, 6-4 असे सरळ सेट्समध्ये पराभवाचा धक्का दिला. या वर्षाच्या सुरुवातीलादेखील अलेक्झांडर ज्वेरेवने नदालवर ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मात केली होती. माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेत त्याची पुनरावृत्ती झाली. आता तो पुढच्या आठवड्यात इटालियन ओपन खेळणार आहे. पराभवानंतर नदाल म्हणाला, हा आठवडा माझ्यासाठी फारच महत्त्वपूर्ण होता. मी फार निराशावादी असल्यासारखे वाटत आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply