Breaking News

बाल नाट्य स्पर्धेची कार्यशाळा उत्साहात

परेश ठाकूर, राजू तुलालवार यांनी केले मार्गदर्शन

पनवेल : रामप्रहर वृत्त
चांगल्या प्रकारे व्यक्त होण्यासाठी आपल्याकडे चांगले विचार, भाषा आणि योग्य ठिकाणी असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेलचे शाखेचे उपाध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले. ते मंगळवारी (दि. 18) बाल नाट्य स्पर्धेच्या कार्यशाळेत व्यक्तिमत्त्व विकास आणि भाषाशैली या संदर्भात मार्गदर्शन करीत होते.
दोन वर्षांच्या कठीण काळानंतर शाळा नव्या उत्साहात सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या उत्साहाला आणि ऊर्जेला एक नवी दिशा देण्याचा संकल्प श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल यांनी केलेला असून त्या अनुषंगाने मार्केट यार्ड येथील मंडळाच्या सभागृहात बाल नाट्य स्पर्धेची कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत बालनाट्यांचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजू तुलालवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेलचे शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 16 वर्षे या दोन्ही संस्था अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा अतिशय भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करीत आहे. या स्पर्धेत अनेक होतकरू रंगकर्मींनी आपला ठसा उमटवून व्यावसायिक नाट्य क्षेत्रात यशस्वी पदार्पण केलेले आहे. पनवेल, उरण परिसर सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध परिसर असून हा कलाकारांचा प्रदेश आहे. विद्यार्थ्यांमधील अभिनय कलेला प्रोत्साहन मिळावे, त्यांना रंगमंच उपलब्ध व्हावा त्याचबरोबर एक सृजनशील पिढी तयार व्हावी म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला.
प्रत्येक बालकात उपजतच एक नट दडलेला असतो. त्यामुळे बाल नाट्य निर्माण करणार्‍या मार्गदर्शकांना त्यांच्या शंकांचे निरसन आणि प्रोत्साहन देण्यासाठी परिषदेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बलरंग भूमी परिषदेचे उपाध्यक्ष राजू तुलालवार, रंगनील नाट्य संस्थेच्या अध्यक्ष कल्पना कोठारी, श्यामनाथ फुंडे, सीकेटी विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांच्यासह विविध विद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.

Check Also

झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!

‌‘पुरवैय्या‌’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …

Leave a Reply