Breaking News

मोहन बागानचे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

एएफसी चषक स्पर्धेचे सामने लांबणीवर

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
प्रबिर दास आणि एसके साहिल या एटीके मोहन बागानच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मालदीव येथे होणारे एएफसी चषक स्पर्धेचे सामने अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यात आले आहेत.
‘ड’ गटातील सामन्यांसाठी एटीके मोहन बागानचा संघ मालदीवला रवाना होणार होता. त्याआधी सर्व खेळाडूंची कोलकाता येथील खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये प्रबिर दास आणि एसके साहिल या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) नियमानुसार रवाना होण्याच्या दोन दिवसाआधी सहभागी खेळाडूंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह येणे बंधनकारक आहे. त्यामुळे एएफसी चषकातील साखळी लढती पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.

Check Also

खानावमध्ये शेकाप कार्यकर्ते भाजपात

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा …

Leave a Reply