Breaking News

बेशिस्त वाहनचालकाांविरोधात कारवाई करा; सर्वसामान्यांची मागणी

पनवेल ः वार्ताहर

लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यापासून मोठ्या प्रमाणात पनवेल परिसरातील रहिवासी खरेदी व इतर कामांसाठी पनवेल बाजारपेठेत येत आहेत. या वेळी ते आणत असलेली दुचाकी व चारचाकी वाहने वाहतूक नियमांचे पालन न करता कुठेही रस्त्यावर बेशिस्तपणे उभी करीत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. तरी वाहतूक शाखेने पूर्वीप्रमाणे अशा बेशिस्त वाहनचालकांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात करावी, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. पनवेल शहरात काही बेशिस्त मोटरसायकलस्वार रस्त्यावरच दोन्ही बाजूला वाहने पार्क करून ठेवत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या जटिल बनत चालली आहे. अनेक ठिकाणी रस्ते छोटे असल्याने व रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने पार्किंग केल्यामुळे दोनच गाड्या पास होऊ शकतील एवढासा रस्तासुद्धा शिल्लक राहत नाही. त्यामुळे शहरातील शिवाजी रोड, टपाल नाका, उरण नाका, सोसायटी मार्ग, भाजी मार्केट या भागात वाहतूक कोंडी होत आहे. सध्या सर्वत्र दुकाने उघडल्याने नागरिकांचा खरेदीसाठी ओघ सुरू झाला आहे. बाजारातही मोठी गर्दी झाली आहे. बेशिस्त वाहनचालक कुठेही रस्त्यावर आपली वाहने उभी करीत आहेत. त्याचा सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास होत आहे. तरी वाहतूक शाखेने अशा बेशिस्त वाहनचालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply