Breaking News

टोकियो ऑलिम्पिक रद्द करा!

अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेदरम्यान चाहत्यांची निदर्शने

टोकियो ः वृत्तसंस्था
जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष सेबॅस्टियन को 11 आठवड्यांवर येऊन ठेपलेली टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा कितपत सुरक्षित आहे, असे आश्वासन देत असतानाच निदर्शकांनी त्यांच्या या कार्यात व्यत्यय आणला. जवळपास हजारो चाहत्यांनी राष्ट्रीय स्टेडियमला धडक देत ऑलिम्पिकविरोधी घोषणाबाजी केली.
जपानमध्ये रंगणार्‍या ऑलिम्पिकला होणारा विरोध दिवसेंदिवस वाढू लागला आहे. टोकियोच्या मध्यभागी असलेल्या राष्ट्रीय स्टेडियमबाहेर निदर्शकांनी रविवारी गोंधळ घातला. ‘ऑलिम्पिक गरिबांसाठी मारक ठरत आहे’, ‘ऑलिम्पिकचा खेळ बंद करा,’ अशा घोषणा त्यांनी दिल्या.
टोकियो ऑलिम्पिक रद्द करण्यासाठी ऑनलाइन याचिका दाखल करण्यात आली असून, त्याला तीन लाख लोकांनी स्वाक्षर्‍या देऊन आपला पाठिंबा दर्शविला आहे. जपानमधील काही वैद्यकीय अधिकार्‍यांनीही ऑलिम्पिक रद्द करण्याची मागणी केली आहे. जपानमध्ये कोरोनाचा कहर वाढत चालला असून, सध्या केवळ दोन टक्के लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply