Breaking News

केवाळे पुलाच्या कामाला सुरुवात

पावसाळ्यापूर्वी नवीन पुलाचे काम पूर्ण होणार

पनवेल ः बातमीदार : तालुक्यातील केवाळे गावाजवळील नवीन व रुंद पुलाच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरुवात करण्यात आली आहे. जुना पूल पाडून नागरिकांना जाण्या येण्यासाठी पर्यायी रस्ता ठेवण्यात आला आहे. केवाळे येथील अरुंद पुलामुळे नागरिकांना अनेकदा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत वाकडी व केवाळे गावाला जोडण्यासाठी पूल बांधण्यात आला होता. पुलाच्या खालील बाजूस असलेल्या स्टीलला गंज चढू लागला होता. खालील बाजूचे सिमेंटचे प्लास्टरदेखील गळू लागले होते. त्यामुळे हा पूल धोकादायक बनला होता.आचारसंहिता लागण्यापूर्वी या पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या आत हा नवीन व रुंद पूल तयार होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.या भागात केवाळे, वाकडी, चिंचवली, उसर्ली, दुंदरे, मोरबे यांच्यासह आदिवासी वाड्यांचे प्रमाण अधिक असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. केवाळे येथील अरुंद ठरत असलेला पूल पाडण्यात आला असून, त्या ठिकाणी 10 बाय 3 मीटरचे गाळे असलेला नवीन पूल बांधण्यात येत आहे. त्याची  रुंदी 8.25 मीटर करण्यात येणार आहे. यासाठी 1 कोटी 2 लाखांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून, पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होऊन पूल नागरिकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एन. डी. पवार यांनी दिली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply