भाजप नेते किरीट सोमय्यांचा इशारा
मुंबई ः प्रतिनिधी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली असून, सीबीआयनंतर आता सक्तवसुली संचलनालयानेही (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली सीबीआयने अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द केला जावा अशी मागणी करणारी याचिका अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. दरम्यान ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत.
भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर करीत आता अनिल परब यांचा नंर लागणार असल्याचा इशारा दिला आहे. ईडीने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 100 कोटींहून अधिक कोटींची अफरातफतर आहे. अनेक बोगस कंपन्या, कोलकातामधून पैसा आला, वाझे वसुली गँगचा हिस्सा असो किंवा 2010, 2012चा पैसा असोअनिल देशमुख यांना हिशे द्यावा लागणार.
आता पुढे अनिल परब यांचाही नंबर लागणार आहे, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. या प्रकरणात न्यायालयाने सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आता ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांचा पाय खोलात गेला असल्याची चर्चा आहे.