Breaking News

शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचे निधन

नांदेड : प्रतिनिधी
शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते, स्वातंत्र्यसेनानी केशवराव धोंडगे यांचे रविवारी (दि. 1) निधन झाले. औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात वयाच्या 102व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातील गऊळ या गावात केशवराव धोंडगे यांचा जन्म झाला होता. ते सहा वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला आणि लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त होत आहे.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply