खोपोली : वार्ताहर
वासुदेव सेवा मंडळ तसेच स्वराज्य मित्रमंडळ, खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात खोपोलीतील 37 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली.
खोपोली शहरातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या वासुदेव सेवामंडळ तसेच मोगलवाडी येथील स्वराज्य मित्र मंडळ यांच्या वतीने किशोर ओसवल यांच्या निवासस्थानी समर्पण रक्तपेढी मुंबई यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर झाले. शिबिर यशस्वी करण्यासाठी वासुदेव सेवा मंडळाचे किशोर ओसवाल, संदेश पवार, चंद्रशेखर सोनी व स्वराज्य मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, उपाध्यक्ष आकाश क्षीरसागर, कार्यकर्ते सुनील जाधव, कल्पेश लोवंशी, प्रवीण पवार, सूर्यकांत पाटील, प्रसाद निकम, तन्मय देशमुख, हर्षद जाधव आदींनी विशेष प्रयत्न केले.
या वेळी वासुदेव सेवामंडळाचे प्रमुख कार्यकर्ते किशोर ओसवाल यांनी रक्तदान शिबिरासारखे कार्यक्रम सामाजिक कार्य करणार्या मंडळाने आयोजित करावे. ती सर्वांची सामाजिक बांधिलकी असल्याचे त्यांनी सांगितले. रक्तदान करणार्या व शिबिर यशस्वी करणार्या सर्वांचे त्यांनी यावेळी आभार मानले.