Breaking News

रोटरी डिस्ट्रिक्ट 3131च्या प्रांतपालपदी डॉ. अनिल परमार

पनवेल : वार्ताहर

रोटेरियन डॉ. अनिल परमार यांनी पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे प्रांतपाल म्हणून सुत्रे स्विकारली. मावळते प्रांतपाल रोटेरियन पंकज शहा ह्यांनी डॉ अनिल ह्यांना प्रांतपालपदाची कॉलर घातली. या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, आंतरराष्ट्रीय रोटरी फाऊंडेशनचे प्रमुख ट्रस्टी डॉ. भरत पंड्या, आंतरराष्ट्रीय रोटरीचे डायरेक्टर डॉ. महेश कोटबागी, माजी प्रांतपाल रवी वडलामानी व रोटरी जगतातील बरेच सन्माननीय सदस्य व 600 हून अधिक पुणे व पनवेल विभागातील रोटेरियन उपस्थित होते. रोटरी फाऊंडेशनला भरघोस आर्थिक पाठबळ देणार्‍या देणगीदारांचे सत्कार या वेळी करण्यात आले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply