Breaking News

भुवनेश्वर कुमार घेणार निवृत्ती?

मुंबई ः प्रतिनिधी

भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भुवनेश्वरला यापुढे कसोटी क्रिकेट खेळायचे नाही आणि तो फक्त टी-20 क्रिकेटवर लक्ष केंद्रित करीत आहे. भुवनेश्वरला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले नाही. त्याला संघात स्थान न मिळाल्याबद्दल अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. सूत्रांनुसार भुवीला वन डे क्रिकेटमध्येही रस नाही आणि त्याला फक्त टी-20 खेळायचे आहे. भुवनेश्वर कुमार टी-20 क्रिकेटमध्ये पुढील संधीची तयारी करीत आहे. त्याला यापुढे कसोटी क्रिकेट खेळायचे नाही. आता त्याची लय गेली आहे. भुवी एकदिवसीय क्रिकेट खेळण्यासही इच्छुक आहे असे निवड समितीलासुद्धा वाटत नाही. भारतीय संघाचे हे मोठे नुकसान आहे. कारण जर इंग्लंड दौर्‍यासाठी कोणत्याही खेळाडूला संघात असायला हवे होते, तर तो भुवनेश्वर कुमार होता. भुवनेश्वर कुमारने जानेवारी 2018मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता, मात्र यानंतर दुखापतीमुळे तो संघात आत-बाहेर होत राहिला. भुवनेश्वर कुमार आतापर्यंत बर्‍याच वेळा दुखापतग्रस्त झाला. यामुळे तो आयपीएल किंवा भारताकडून सातत्याने खेळू शकला नाही. कदाचित यामुळेच भुवनेश्वरने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. भुवनेश्वरने 2019मध्ये भारताकडून कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. त्यानंतर आतापर्यंत त्याने केवळ 21 कसोटी सामने खेळले. त्यात त्याने 26.09च्या सरासरीने 63 बळी घेतले. भुवनेश्वरने इंग्लंडविरुद्ध पाच कसोटींत 19 बळी घेतले. 2014च्या दौर्‍यात भुवीने ही कामगिरी केली होती.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply