मुंबई : कोरोना या वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना तन-मन-धनाने मदत करणारे रायगडचे माजी खासदार, दानशूर व्यक्तिमत्त्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दै. शिवनेरच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे कोरोना देवदूत पुरस्कार प्रदान करून बुधवारी सन्मानित करण्यात आले. या समारंभाला सन्माननीय अतिथी म्हणून माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह तसेच आयोजक ‘शिवनेर’चे संपादक नरेंद्र वाबळे उपस्थित होते. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्यपाल कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. सोबत जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सभागृह नेते परेश ठाकूर व अमोघ ठाकूर.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …