Breaking News

ईदनिमित्त गरजूंना अन्नदान, शिरखुर्मा वाटप

पनवेल : वार्ताहर

पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेच्या वतीने मुस्लिम बांधवांच्या ईद सणानिमित्त 25 किलो चिकन, भाजी व 25 किलो भात शिजवून मोफत अन्नदान करण्यात आले. पंचशील नगर, आदई तलाव झोपड्या, नवीन पनवेल सेक्टर 6 समोरील झोपड्या पनवेल बस स्थानक रेल्वे स्टेशन परिसरातील सुमारे 350 लोकांना हे अन्नदान करण्यात आले. याचबरोबर पनवेल, नवीन पनवेल, खांदेश्वर पोलीस ठाण्यातील कार्यरत पोलीस बांधवांना व पंचशील नगर येथे शिरखुर्मा वाटप करण्यात आला. जूम्मंन भाई खान यांनी चिकन व शिरखुर्मा दिला. अमोल परदेशी यांनी तांदळाचे पोते देऊन मदत केली.

या कार्यात संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे, उपाध्यक्ष अशोक आखाडे, खजिनदार भानुदास वाघमारे, सचिव राहुल पोपलवार, सहसचिव विनोद खंडागळे, संघटक कैलास नेमाडे, सल्लागार वकील रामभाऊ कांबळे, कमिटी सदस्य अजय दुबे, अमेय इंगोले, रामदास खरात, हेमा रोड्रिंक्स संतोष जाधव वल्ली महमद शेख, संतोष ढोबळे, संजय धोत्रे, हरीचंद बनकर, शोभा गवई, विनोद तायडे, आदींसह मेहनत घेणारे रहिवाशी दीपक खरात, विनोद इंगोले, सुशांत पाटील, अंकुश पाखरे, बंडू गाडगे, सागर चव्हाण, अनिल खिलारे, अमोल गाडगे, जितू घाटविसावे, संजय कंठाळे, संजय तायडे, जूम्मंनभाई, संजीव ठाकूर, मनोज ठाकूर, आमन तायडे, अविनाश पराड, करन बोराडे, गोपाल उबाळे, उमेश पलमाटे, अनिल वानखेडे, धीरज नाईक, रोहित पवार, संतोष पाल, अमोल डाके, रोहित चव्हाण आदींबरोबर महिला भगिनी पल्लवी आखाडे, रुपाली खंडागळे, अक्षदा कदम, सरस्वती वाकुडे, विजय मला कुशबा, शांतावा मस्के, पवित्र खंडागळे, आरती कुशबा, निकीती वाकुडे, आदीनी मेहनत घेतली.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply