Breaking News

पोलिसांच्या आवाहनानंतर गुंतवणूकदारांना घाम

खोपोली : प्रतिनिधी

खालापूर पोलिसांच्या वतीने फसवेगिरी करणार्‍या तसेच आर्थिक गुंतवणूक करणार्‍या कंपन्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर खालापूरसह परिसरात अनेक गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आपली कंपनी तर नाही ना या भीतीने थंङीतही गुंतवणूकदार घामाघूम झाले.

ऑनलाइन फसवणूक, बँक मॅनेजर बोलतोय, असे सांगून ओटीपी मागून होणारे फसवणुकीचे गुन्हे सर्वत्र घडत असताना त्यात ठरावीक रक्कम गुंतवणूक करून जास्त आमिषाचे व्याज दाखविणार्‍या कंपन्यांची भर पडली आहे. गेल्या चार वर्षांत अशा पाचपेक्षा अधिक कंपन्या बंद पङल्यापासून गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले आहेत. काही ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या तर काही ठिकाणी गावपातळीवरील ओळखीचा एजंट म्हणून तक्रार दाखल न करता आज ना उद्या पैसे मिळतील या आशेवर अनेक जण आहेत. अशा गुन्ह्यांना पायबंद बसावा म्हणून खबरदारीच्या उपायासाठी सध्याचे प्रभावी माध्यम असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप

समाजमाध्यमातून जागरूकतेसाठी खालापूरचे पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले. यामध्ये गुंतवणूकदारांची फसवणूक झालेल्या एका कंपनीचा उल्लेख पोलीस निरीक्षक काईंगडे यांनी केला आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply