खोपोली, खालापूर : प्रतिनिधी : पोलाद उत्पादन करणार्या खोपोलीतील इंडिया स्टील कारखान्याच्या एओडी विभागातील बॉयलरच्या ठिकाणी रविवारी (दि. 14) दुपारी अचानक स्फोट झाला. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते.खोपोली शहरात प्रदूषणाच्या मुद्यावरून स्थानिक व इंडिया स्टील कारखाना व्यवस्थापन यांच्यात नेहमीच वाद सुरू असतात. या कारखान्यात वारंवार स्फोट होऊन अपघाताच्या घटना घडत असताना रविवारी दुपारी पुन्हा एकदा कारखान्याच्या एओडी बॉयलर विभागात स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला व यामध्ये कंपनीतील कच्च्या मालाने पेट घेतला. खोपोली नगर परिषद व टाटा कंपनीच्या अग्निशमन दलाने सदरची आग आटोक्यात आणली. या स्फोटाचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कंपनीकडे धाव घेतली, मात्र कंपनी व्यवस्थापनाचे कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते.
Check Also
खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …