Breaking News

पनवेल तहसीलमार्फत परिसरातील आश्रमांना मदत

पनवेल : वार्ताहर

पनवेल तहसील कार्यालयामार्फत तालुक्यातील अनाथ आश्रमांना लोकसहभागातून मदतीचा हात देण्यात आला.तहसील कार्यालयामार्फत तालुक्यामधील अनाथ आश्रमांचा सर्व्हे करण्यात आला व पनवेल परिसरातील आश्रमांतील नागरिकांची संख्या विचारात घेता तहसीलदार कार्यालय पनवेल मार्फत लोकसहभागातुन अनाथ आश्रमांना मदतीचा हात देण्यात आला आहे. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा वाटप करण्यात आला. लोणीवली येथील सिल आश्रम, वरलेश्वर आधारघर, नेरे येथील  वृध्दाश्रम, स्नेहकुंज आधारगृह, शुभम वृध्दाश्रम, सांगटोली येथील जनाधर्म वृध्दाश्रम, वाकडी येथील आधारपुष्प सेवा सदन, शांतीवन कुष्ठरोगी, शांतीवन वृध्दाश्रम, शांतीवन आधारघर, उसी बु. येथील शिवाश्रय आधारघर, उमरोली येथील करुणेश्वर वृध्दाश्रम, कोळखे येथील जनकल्याण सेवाश्रम, परम शांतीधाम वृध्दाश्रम अशा प्रकराच्या आश्रमांना मदतीचा हात देण्यात आला आहे.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply