Breaking News

जीपी पारसिक सहकारी बँकेचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त

जीपी पारसिक सहकारी बँक 50व्या वर्षांत (सुवर्ण महोत्सवी वर्षात) पदार्पण करत असताना ग्राहकांसाठी बँकेने सुवर्णसंधी दिली आहे. भारतात सर्वांत कमी गृहकर्ज व्याजदर 6.65 टक्के करण्यात आले आहे, तसेच वाहन कर्ज 7.75 टक्के सोने तारण कर्ज 8.25 टक्के करण्यात आले आहेत, असे बँकेचे अध्यक्ष रणजीत पाटील, उपाध्यक्ष नारायण गावंड व संचालक केसरीनाथ घरत यांनी जाहीर केले आहे. या वेळी बँकेच्या पनवेल येथील शाखेमध्ये कार्यालयात सुंदर सजावट करून मान्यवर, संचालक केसरीनाथ घरत, क्लस्टर हेड विनोद पाटील, बिझनेस डेव्हलोपमेंट सि. मॅनेजन दिनानाथ म्हात्रे व शाखाधिकारी मुकुंद कडू व खातेदार नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, व्यवसाईक वैभव देशमुख, यतीन पाटील, शिवकृपा व्यवस्थापक गोविंद पोळ, सुरदार गोवारी, विकास गायकवाड, राकेश भुजबळ आदी उपस्थित होते. पनवेल शाखेचे सर्व कर्मचारी आलेल्या मान्यवरांचे स्वागत करीत होते.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply