Breaking News

पनवेलच्या कल्पतरू सोसायटीत कोविड प्रतिबंधक लसीकरण

पनवेल : वार्ताहर

कल्पतरू रिव्हरसाईड गृहनिर्माण संस्थेने बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटलच्या सहकार्याने शनिवारी (दि. 22) लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सोसायटीतील पाचही इमारतीमध्ये राहणार्‍या 900 रहिवाशांनी सहभाग घेतला.

लसीकरण करताना कोरोना-19च्या नियमानुसार योग्य सामाजिक अंतर राखत 900 रहिवाशांचे टोकन सिस्टीम पद्धतीने लसीकरण करण्यात आले. आपल्या सोसायटीच्या आवारातच लसीकरणाचे कार्यक्रम आयोजित करणारी कल्पतरू रिव्हरसाईड सोसायटी ही पनवेल महानगरपालिका आणि रायगड जिल्ह्याच्या अखत्यारितील पहिली आणि नवी मुंबईतील दुसरी सोसायटी आहे.

या सोसायटीचे अध्यक्ष उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनीर सेल्वम, सचिव नितीन ठाकूर यांनी परेश ठाकूर यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. सोसायटीतील 18 वर्षावरील सर्वांना या वेळी लस देण्यात आली.

या वेळी ज्येष्ठ नगरसेवक अनिल भगत, भाजप शहर चिटणीस नितीन पाटील हेही उपस्थित होते. या उपक्रमाच्यावेळी पनवेल महानगरपालिकेकडून उपस्थित असलेल्या लसीकरण प्रमुख मनीषा चांडक आणि अपोलो रुग्णालयाचे विशेष आभार मानण्यात आले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply