पनवेल : रामप्रहर वृत्त
कसळखंड ग्रामपंचायतीचे माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रप राबवत रविवारी (दि. 10) साजरा झाला. त्याअंतर्गत वाढदिवसानिमित्त आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक आमदार निधीमधून करण्यात येणार्या विकासकामांचा शुभारंभ, तसेच रक्तदान व मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात होते. या विकासकामांचे भूमिपूजन उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले. त्यांनी या शिबिरांना भेट देत अनिल पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कसळखंडचे माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक आमदार निधीमधून 18 लाख रुपयांच्या कसळखंड गावापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे, 8 लाख रुपयांच्या अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाचे आणि 5 लाख रुपयांच्या कसळखंड अंतर्गत रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्याचबरोबर कसळखंड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आय व्हिजन ऑप्टीक्सच्या सहकार्याने नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे 200 नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली. 50 जणांचेे मोतीबिंदूचे मोफत ऑपरेशन करण्यात येणार आहे. या शिबिरात 150 नागरिकांना मोफत चष्मेवाटप करण्यात आले. कच्छ युवक संघने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कसळखंड ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनामुळे कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झालेल्या चार कुटुंबांना 10 हजार रुपयांची आर्थिक मदत व कोरोना काळात समाजासाठी कार्य करणार्या व्यक्तींचा ‘कोविड योद्धा’ म्हणून सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिरही आयोजित करण्यात आले होते. या वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महापालिकेचे नगरसेवक बबन मुकादम, माजी सरपंच अविनाश गाताडे, कसळखंड ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी अनिल पाटील, सदस्य महेंद्र गोजे, सदस्या निवदिता नितीन लबडे, राजेश्री रवींद्र घरत, मोनिका महादेव पाटील, माजी उपसरपंच रोहित घरत, संजना नाईक, भाजप नेते प्रवीण खंडागळे, पोयंजे पंचायत समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर सुर्वे, साईचे माजी सरपंच विद्याधर मोकल, प्रवीण ठाकूर, गणेश आगिवले, वसंत आगिवले, राजेश लबडे, राकेश ठाकूर, भाताण ग्रामपंचायत सदस्य तानाजी पाटील, ज्येष्ठ नेते सुभाष जेठू पाटील, राम हातमोडे, बुथ अध्यक्ष धनंजय पाटील, युवा मोर्चाचे योगेश लहाने, दिनेश पाटील आदी उपस्थित होते.