पनवेल : वार्ताहर
पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेने चालू केलेल्या सोमवार शुक्रवार मोफत अन्नदान कार्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या संस्थेने अन्नदान उपक्रमात गरीब गरजू 300 ते 350 लोकांना अन्नदान केले. दरम्यान, समाजसेवक सुनील वानखेडे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान संस्थेकडे सुपूर्द करून अन्नदान वाटप केले.
या वेळी पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे यांनी सुनील वानखेडे यांचे आभार मानले व असेच इतरांनी वाढदिवसानिमित्त किंवा इतर कार्यक्रमानिमित्त आमच्या संस्थेस दान देऊन अन्नदानाच्या कार्याला मदत करण्याचे आवाहन केले आहे.
या सामाजिक कार्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष अशोक आखाडे, खजिनदार भानुदास वाघमारे, सचिव राहुल पोपलवार, सहसचिव विनोद खंडागळे, संघटक कैलास नेमाडे, सल्लागार वकील रामभाऊ कांबळे, कमिटी सदस्य अजय दुबे, अमेय इंगोले, रामदास खरात, हेमा रोड्रिंक्स संतोष जाधव, वल्ली महमद शेख, संतोष ढोबळे, संजय धोत्रे, हरीचंद बनकर, शोभा गवई, विनोद तायडे, आदी सह विशेष मेहनत घेणारे रहिवाशी सुशांत पाटील, दीपक खरात, विनोद इंगोले, अंकुश पाखरे, कडबा गाडगे, सागर चव्हाण, अनिल खिलारे, अमोल गाडगे, जितू घाटविसावे, संजय कंठाळे, संजय तायडे, जूम्मंनभाई, संजीव ठाकूर, मनोज ठाकूर, आमन तायडे, अविनाश पराड, करन बोराडे, गोपाल उबाळे, उमेश पलमाटे, अनिल वानखेडे, धीरज नाईक, रोहित पवार, संतोष पाल, अमोल डाके, रोहित चव्हाण आदींबरोबर महिला भगिनी पल्लवी आखाडे, रुपाली खंडागळे, अक्षदा कदम, सरस्वती वाकुडे, विजय मला कुशबा, शांतावा मस्के, पवित्र खंडागळे, आरती कुशबा, निकीती वाकुडे, आदी मेहनत घेत आहेत.