पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील वाकडी ते चिंचवली आणि दुंदरेपाडा ते दुंदरे या रस्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन निधीमधून काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि. 24) करण्यात आले.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन निधीमधून वाकडी ते चिंचवली या रस्त्यासाठी 30 लाख आणि दुंदरेपाडा ते दुंदरे या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 20 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या रस्त्याच्या कामांचे सोमवारी भूमिपूजन झाले. या कार्यक्रमास भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, जि. प. सदस्य अमित जाधव, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, सोशल मीडिया सेलचे तालुकाध्यक्ष राजेश पाटील, दुंदरेच्या सरपंच अनुराधा वाघमारे, उपसरपंच किशोर पाटील, माजी उपसरपंच रमेश पाटील, वाकडीचे माजी सरपंच नरेश पाटील, नामदेव जमदाडे, शांताराम चौधरी, गणेश उसाटकर, सुनील शेळके, नारायण चौधरी, गुरूनाथ भोपी, गणेश भोपी, विष्णू चौधरी, शत्रुघ्न उसाटकर, अमर पाटील, मच्छिंद्र पाटील, अमर शेळके, नितेश डागरकर, विठ्ठल शेळके, कचरू शेळके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …