मुंबई ः प्रतिनिधी
राज्यात सुरू असलेला लॉकडाऊन संपणार की आणखी वाढणार याबाबत नागरिकांच्या मनात प्रश्नचिन्ह आहेत. मागील काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये लॉकडाऊनसंदर्भात विविध प्रकारच्या बातम्या येत आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनबाबतचा निर्णय शुक्रवारी होणार्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेतला जाणार आहे, अशी माहिती दिली.
कोरोना तसेच म्युकरमायकोसिस आजारासंदर्भात मंत्रालयात मंगळवारी (दि. 25) बैठक पार पडली. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री टोपे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. राज्यातील लॉकडाऊन 31 मे रोजी संपणार आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षत्येखाली होणार्या बैठकीत राज्यातील लॉकडऊनची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचे या वेळी टोपे यांनी दिली.
कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे राज्यात 1 जूनपर्यंत कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. दरम्यान, रुग्णसंख्या कमी होत असल्याने राज्य सरकारकडून लॉकडाऊन शिथिल केला जाण्याची शक्यता आहे. सरकार टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल करण्याची योजना आखत असल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरकारकडून लॉकडाऊन उठवण्याची तयारी सुरू झाली असून 30 जूनपर्यंत सर्व गोष्टी पार पडतील. निर्बंध शिथिल करण्यास नेमकी कधीपासून सुरुवात होईल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तिसर्या लाटेची भीती असल्याने निर्बंध पूर्णपणे उठवले जाणार नाहीत, मात्र काही प्रमाणात शिथिलता दिली जाऊ शकते.
Check Also
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …