Breaking News

जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धा : विराट करणार विक्रम

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली न्यूझीलंडविरुद्ध पुढील महिन्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) फायनलमध्ये जेव्हा मैदानावर उतरेल तेव्हा एक इतिहास घडवेल. या सामन्यात विराट कोहली भारताकडून सर्वाधिक कसोटी सामन्यात नेतृत्व करणारा खेळाडू ठरले. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवल्यास तो जगातील सर्वांत यशस्वी कर्णधारांमध्ये चौथ्या स्थानावर पोहचेल. विराटने आतापर्यंत 60 कसोटी सामन्यांत भारताचे नेतृत्व केले असून माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. इंग्लंडविरुद्ध 18 जूनपासून सुरू होणार्‍या लढतीत विराट मैदानावर उतरताच भारताकडून सर्वाधिक कसोटीत नेतृत्व करण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा होईल. विराटने या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी मालिकेत धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. त्याआधी ऑस्ट्रेलिया दौर्‍यातील तीन कसोटी मुलीच्या जन्मामुळे तो खेळला नव्हता. 2014 साली विराटने कसोटी संघाचे नेतृत्व हाती घेतले. आतापर्यंत त्याने 60 सामन्यांत कर्णधार म्हणून भूमिका बजावली आहे. या 60 पैकी 36मध्ये विजय मिळवला आहे. हादेखील एक विक्रम आहे. धोनीने 60 पैकी 27 लढतींमध्ये विजय मिळवला होता. 2 जून रोजी भारतीय संघ इंग्लंड दौर्‍यावर जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची मालिका होणार आहे. या संपूर्ण साडेतीन महिन्यांच्या दौर्‍यात विराटने एक विजय मिळवल्यास तो कसोटीत सर्वाधिक विजय मिळवणारा जगातील चौथ्या क्रमांकाचा कर्णधार ठरेल. याबाबत विराट वेस्ट इंडिजचे महान कर्णधार क्लाइव्ह लॉयड यांना मागे टाकू शकतो. लॉयड यांनी 74 पैकी 36 कसोटींमध्ये विजय मिळवला होता. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ 109 पैकी 53 विजयासह पहिल्या, ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंंग 77 पैकी 48 विजयासह दुसर्‍या आणि स्टीव वॉ 57 पैकी 41 विजयासह तिसर्‍या स्थानावर आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply