Breaking News

कॅनरा बँकेकडून आदिवासी कुटुंबांना मदतीचा हात

कर्जत पोशिरमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कर्जत : बातमीदार

कॅनरा बँकेच्या सीएसआर निधीमधून पोशिर (ता. कर्जत) ग्रामपंचायतीमधील सहा वाड्यांतील 450 आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्यात आली. बँकेच्या कर्मचार्‍यांनी या वस्तूंचे वाटप केले.

लॉकडाऊन काळात अनेकांचे हाल होत आहेत. अनेकांच्या नोकर्‍या गेेल्या. या पार्श्वभूमीवर दुर्गम भागातील आदिवासींच्या मदतीसाठी कॅनरा बँकेच्या मुंबई विभागाने पुढाकार घेउन त्यांना ’एक हाथ मदतीचा’ दिला आहे. बँकेच्या सीएसआर फंडातून पोशीर ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील उंबरवाडी, गिर्‍हाचीवाडी, देवपाडा, चिंचवाडी, वाघ्याचीवाडी आणि चिकनपाडा कातकरीवाडी येथील सुमारे 450 कुटुंबांना किराणा सामानाचे वाटप करण्यात आले.

कॅनरा बँकेचे जनरल मॅनेजर लखबीर सिंह, डेप्युटी जनरल मॅनेजर अरुणकुमार मिश्रा, डेप्युटी जनरल मॅनेजर मनोजकुमार दास, बँकेच्या मुंबई विभागाचे पदाधिकारी राजेंद्र कुलकर्णी, नेरळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक तानाजी नारनवर यांच्यासह बँक कर्मचारी व आदिवासी कुटुंबिय या वाटप कार्यक्रमावेळी उपस्थित होते.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply