Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वस्तूंचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70 वा वाढदिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कार्यक्रम सुरु आहेत. त्या अनुषंगाने जावळे, शिवकर, सावळे, जाताडे येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. 

भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या सुयोग्य नियोजनातून तालुक्यातील गावागावांमध्ये गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे.

Check Also

सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक अडथळे दूर करीत काही महिन्यांत पूर्णत्वास येणार …

Leave a Reply