Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना मदतीचा ओघ कायम

पनवेल ः रामप्रहर वृत्त

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने रविवारी (दि. 30) केवाळे, चिखले, वाजे ग्रामपंचायत, मोहो, सांगडे, कामोठे गुरुद्वारा, चिंचपाडावाडी, कोल्ही (कोपर), दापोली, कुंडेवहाळ, कोळखे, नांदगाव, तळोजा फेज-1, भानघर, जांभिवली, उसर्ली (रिटघर) आदी गावांत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जाणार आहे.

या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जि. प. सदस्य अमित जाधव, किशोर सुरते, प्रमोद भिंगारकर, अनेश ढवळे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, संतोष शेळके आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजपतर्फे तालुका व महापालिका क्षेत्रात सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या सुयोग्य नियोजनातून अन्नधान्याचे वाटप होत आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply