खोपोली : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, विविध शासकीय कार्यालये, पोलीस ठाणे, खोपोली नगर परिषद कार्यालय या ठिकाणी गुरुवारी स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने नगर परिषदेने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणार्या व्यक्तींचा
सन्मान केला. नगराध्यक्षा सुमन औसरमल यांच्या हस्ते खोपोली नगर परिषदेच्या पटांगणात ध्वजवंदनाचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, शिक्षण सभापती केविना गायकवाड, मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्यासह सर्व सभापती, नगरसेवक, कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती होती. खालापूर तालुका शिक्षण मंडळचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम जनता विद्यालयाच्या पटांगणात झाला. संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप पोरवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी अध्यक्ष दत्ताजी मसुरकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
खालापूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तालुक्याचा मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम तहसीलदार इरेश चप्पलवार यांच्या हस्ते झाला. यावेळी शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, आजी, माजी लोकप्रतिनिधी व नागरिक
उपस्थित होते.स्वातंत्र्य दिनानिमित्त खोपोली नगर परिषदेकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा नगराध्यक्ष सुमन औसरमल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी सुमन औसरमल यांनी पुरग्रस्त जनतेला मदत करण्याचे आवाहन केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper