Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्यातर्फे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सुकापूरमध्ये गरजूंना, नेरे येथील स्नेहकुंज आश्रमाला आणि तळोजा येथील परमशांती वृद्धाश्रमाला बुधवारी (दि. 2) भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते धान्यवाटप करण्यात आले. तळोजा येथील परमशांती आश्रमाला तोंडरे गावाचे माजी सरपंच व पनवेल ग्रामीण उपाध्यक्ष राम महादू पाटील आणि युवा मोर्चा तालुका चिटणीस रोशन पाटील यांच्या वतीने धान्यवाटप करण्यात आले. सुकापूर येथे धान्यवाटप करतेवेळी भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, सरपंच योगिता पाटील, उपसरपंच अशोक पाटील, ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, दिवेश भगत, प्रमोद भगत, आत्माराम पाटील, पांडूरंग केणी, सरचिटणीस महेश केणी, आनंद म्हस्कर, गाव कमिटी अध्यक्ष राजेश पाटील, तर स्हेनकुंज आधारगृह येथे वाटप करतेवेळी पनवेल तालुका भाजप युवा मोर्चा सरचिटणीस विश्वजीत पाटील, खारघर भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष शुभ पाटील, विघ्नेश पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply