Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नवी मुंबई निवडणूक प्रभारी, कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर यांच्या हस्ते गरजू नागरिक, पालिका कामगार, पत्रकार, मुस्लिम समाजातील गरजूंना धान्यवाटप करण्यात आले.

या वेळी अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दिकी, महाराष्ट्र अध्यक्ष हाजी एजाज देशमुख, पंतप्रधान जन कल्याणकारी योजना महाराष्ट्र राज्य मीडिया प्रभारी साबीर शेख, ज्येष्ठ पत्रकार ‘वादळवारा’चे संपादक विजय कडू, सामान्य नागरिकचे उपसंपादक आसीम शेख, रायगड संदेशचे संपादक विशाल सावंत, कोकण डायरीचे नवी मुंबई प्रतिनिधी इरफान शेख, उद्योजक अमजद खान, भावेश तळेकर, मंगल तळेकर, सामाजिक कार्यकर्ता इरफान तांबोळी, विकास होंकल्स, रवी मायदे इतर कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उपक्रमांतर्गत नगरसेवक व भाजप शहर सरचिटणीस नितीन पाटील यांच्या तर्फे प्रभाग 18 मधील नागरिकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. धान्य वाटप कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून प्रभागातील अनेक रहिवाश्यांनी याचा लाभ घेतला. या वेळी सोशल मीडिया सेल शहर संयोजक प्रसाद हनुमंते, महेश सरदेसाई, विजय डिसोझा, नरेंद्र सोनवणे, उमेश इनामदार, प्रीतम म्हात्रे, विजय म्हात्रे आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

कळंबोलीतील विविध समाजोपयोगी कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

माजी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या आणि कळंबोली शहर अध्यक्ष रवीशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका प्रमिला रविनाथ पाटील यांच्या निधीतून ओपन जीम, लहान मुलांसाठी खेळणे बसविण्यात आली आहे. या जिमचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाला, तसेच या वेळी गरजू नागरिकांना धान्याचे वाटप करण्यात आले.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्यसाधून तसेच भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त प्रभाग 7 मधील सेक्टर 14 येथील उद्यानामध्ये ओमन जीम सुरू करण्यात आली आहे. ही जीम स्थानिक नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधीमधून बसविण्यात आली आहे, तसेच या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित उपक्रमांतर्गत कळंबोलीत गरजू नागरिकांना जीवनावश्युक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या सोहळ्यावेळी पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती मोनिबका महानवर, नगरसेविका प्रमिला पाटील, नगरसेवक अमर पाटील, बबन मुकादम, भाजपचे कलंबोली शहर सरचिटणीस दिलीप बेस्ट, प्रकाश शेलार, देविदास खेडकर, जाठोर साहेब, मच्छिंद्र करूंद, केशव यादव, आजर शेख, कविता गुजर, लैला शेख, वेदिका नवले, राणी राणापुर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply