नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
मुंबईमध्ये विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघ बुधवारी रात्री उशिरा इंग्लंडसाठी रवाना झाला आहे. इंग्लंडमध्ये पोहचल्यानंतर भारतीय संघ 10 दिवस विलगीकरणात राहणार आहे. त्यानंतर भारतीय संघाला सरावाची परवानगी देण्यात आली आहे. भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाल्याचे बीसीसीआयने ट्विट करीत सांगितले. विराट कोहली, रोहित शर्मा, स्मृती मानधना व जसप्रीत बुमराह यांचे फोटो बीसीसीआयने पोस्ट केले आहेत.
भारतीय महिला व पुरुष संघ चार्टर्ड प्लेनने इंग्लंडला रवाना झाले आहेत. भारतीय संघाचा हा चार महिन्यांचा दौरा आहे. इंग्लंड दौर्यावर भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघातील खेळाडूंना कुटुंबीयांना सोबत नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. इंग्लंड सरकारने बीसीसीआयने केलेली मागणी मान्य केली आहे. भारतीय संघासोबत कुटुंबीयदेखील इंग्लंडला रवाना झाले आहेत. खेळाडूंसोबत जाणार्या त्यांच्या फॅमिली मेंबर्सनादेखील कोरोनाच्या प्रोटोकॉलचे पालन करावे लागणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जून रोजी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगणार आहे. इंग्लंडच्या मैदानातील मेगा फायनलनंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिकादेखील खेळणार आहे.
भारतीय संघ ः विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य राहणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वाशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …