Breaking News

नेरळचे पोस्ट ऑफिस पाण्यात; नागरिकांना त्रास, अधिकार्‍यांचे मात्र दुर्लक्ष

कर्जत : प्रतिनिधी

नेरळमध्ये दोन दिवस झालेल्या पावसाने नेरळ पोस्ट ऑफिसमध्ये पाणीचपाणी झाले. या मान्सूनपुर्व पावसात पोस्ट ऑफिसला तळ्याचे स्वरूप आल्याने तेथे येणार्‍या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. कर्जत तालुक्यातील नेरळ खांडा येथे पोस्ट ऑफिसची इमारत आहे. पावसाच्या  पाण्याचा निचरा होण्यासाठी येथे कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नसल्याने दरवर्षी कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून या कार्यालयाला तळ्याचे स्वरूप येते. गेल्या तीन दिवसापासून नेरळ परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसाचे पाणी तुंबून  नेरळचे पोस्ट ऑफिस व परिसरात पाणीचपाणी झाले. नेरळ पोस्ट ऑफिसमध्ये रोज अनेक नागरिक कामानिमित्त येत असतात. मात्र त्यांना पोस्ट सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. कधी इंटरनेट नाही, कधी कर्मचार्‍यांची कमतरता, यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच इमारतीच्या आवारात दरवर्षी पावसाचे पाणी जमा होत असल्याने गुडघाभर पाण्यातून नागरिकांना ये-जा करावी लागते. मात्र त्यावर कोणतीही उपाययोजना येथील अधिकारी करीत नाहीत. येथील अधिकार्‍यांनी बघ्याची भूमिका घेतली असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply