Breaking News

भाजपकडून आदिवासी बांधवांना मदतीचा हात; कर्जतमधील 10 आदिवासी वाड्यांमधील 459 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कडाव : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कर्जत भाजप मंडळाच्या वतीने बुधवारी (दि. 2) तालुक्यातील दहा आदिवासीवाड्यांमधील 459 कुटुंबांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. केंद्र सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने  भाजपच्या कर्जत तालुका मंडळाने ‘सेवाही संघटन‘ या उपक्रमा अंतर्गत तालुक्यातील दहा आदिवासीवाड्यांमध्ये बुधवारी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. भाजपचे तालुका उपाध्यक्ष नरेश जोशी आणि सरचिटणीस राजेश भगत  यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात 459 आदिवासी कुटुंबांना धान्य व जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. भाजपचे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, भाजप किसन मोर्चाचे सुनील गोगटे, युवामोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष किरण ठाकरे, संजय कराळे, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रभाकर पवार, ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया भगत यांच्यासह रोशन पाटील, संदेश कराळे, प्रभाकर पाटील, प्रकाश पाटील, महेश भगत, मंदार मेहेंदळे, दर्शन कांबरी, जयदास जाधव, आत्माराम पवार, केशव तारे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते  व आदिवासी बांधव उपस्थीत होते.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply