Breaking News

श्रीलंका दौर्‍यासाठी धवनकडे नेतृत्व

पृथ्वी शॉचे पुनरागमन, ऋतुराजलाही संधी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
महाराष्ट्राचा प्रतिभावान फलंदाज ऋतुराज गायकवाडची आगामी श्रीलंका दौर्‍यासाठी प्रथमच भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. जुलै महिन्यात श्रीलंकेविरुद्ध होणार्‍या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी अनुभवी सलामीवीर शिखर धवन भारताचे नेतृत्व करणार असून मुंबईकर पृथ्वी शॉचेसुद्धा संघात पुनरागमन झाले आहे.
कोलंबो येथे उभय संघांत तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेण्टी-20 सामने खेळले जाणार आहेत. त्यासाठी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीने 20 जणांच्या भारतीय संघाची निवड केली. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना 24 वर्षीय ऋतुराजने सातत्याने छाप पाडली. राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करणार्‍या चेतन साकारियालादेखील प्रथमच भारतीय संघात स्थान लाभले आहे. इशान किशन आणि संजू सॅमसनकडे यष्टीरक्षणाची तर भुवनेश्वर कुमारकडे उपकर्णधारपदाची  जबाबदारी सोपवण्यात आली आहे,
भारतीय संघ ः शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), यजुवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया.
एकाच वेळी पाच जणांचे पर्दापण
आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणार्‍या भारताच्या दुसर्‍या संघात अनेक नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. या संघात अशा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे ज्यांनी आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली. देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, नितीश राणा, के. गौतम आणि चेतन साकरिया या पाच जणांचे एकाच वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पर्दापण होणार आहे. त्यांच्यासह पृथ्वी शॉ, वरुण चक्रवर्ती, संजू सॅमसन या खेळाडूंनीही आयपीएलच्या 14व्या हंगामासह आधीच्या हंगामात धमाकेदार कामगिरी केली होती.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply