पनवेल : वार्ताहर
छत्रपती संभाजीराजे कोपर्डी येथे जाणार आहेत, तसेच काकासाहेब शिंदे यांच्या घरी सुद्धा भेट देण्यासाठी जाणार आहेत. 12 जूनला पुणे येथून निघणार आहेत. राजेंसोबत रायगडमधून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक जाणार असल्याची राज्य समन्वयक विनोद साबळे यांनी दिली. या संदर्भात दांडफाटा, रसायनी या ठिकाणी मिटिंगला राज्य समन्वयक विनोद साबळे, गणेश कडू, सुनील पाटील, राजेश लाड, राजू गायकवाड, अमोल जाधव, कमलाकर लबडे, यतीन देशमुख, राजू भगत, शशिकांत मोरे, अमित यादव, अनंत चव्हाण, नितीन दगडे आदींची नियोजनासंदर्भात बैठक झाली व शेकडो मराठे रायगड मधून राजे सोबत कोपर्डीला जाणार असे ठरवण्यात आले.