Tuesday , February 7 2023

‘दिबां’च्या नावाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा

पनवेल : वार्ताहर

आगामी काळात होऊ घातलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाला स्वाभिमानी युथ रिपब्लिन पक्षाने पाठिंबा दिलेला आहे. लोकनेते दि. बा. पाटील यांनी सिडको प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. दि. बा. पाटील हे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते होते. त्यांच्याच अथक प्रयत्नामुळे प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना सिडकोकडून साडेबारा टक्के विकसित जमीन मिळाली. दि. बा. पाटील यांच्या संघर्षामुळे सिडकोमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकर्‍यांना तसेच स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या मजूर सहकारी संस्था व स्थानिक प्रकल्पग्रस्त युवकांना सिडकोच्या कामांचे टेंडर मिळाले. सिडकोने संपादित केलेल्या जमिनीवर उभ्या राहिलेल्या प्रकल्पांमध्ये नोकर्‍या मिळाल्या. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भूमीपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी वेचले त्यासाठी आंदोलने केली व आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या. त्यांच्यामुळे आज आम्ही भूमीपुत्र ताठ मानेने जगत आहोत. तरी नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांच्या नावाला स्वाभिमानी युथ रिपब्लिन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज संसारे यांच्या सुचनेनुसार रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने पाठिंबा जाहीर केला आहे.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply