अटीतटीच्या सामन्यात नेदरलँडची युक्रेनवर मात

युरो कप स्पर्धा

अ‍ॅमस्टरडॅम ः वृत्तसंस्था
युरो कपमधील नेदरलँड विरुद्ध युक्रेन सामना अगदी अटीतटीचा झाला. पहिल्या हाफमध्ये एकही गोल न करता आलेल्या दोन्ही संघांनी सामन्याच्या शेवटच्या 45 मिनिटांमध्ये एकूण पाच गोल केले. सामन्याच्या 85व्या मिनिटाला 2-2ची बरोबरी फोडणारा तिसरा गोल करीत नेदरलँडने निसटता विजय मिळवला. हा निर्णायक गोल नेदरलँडच्या डमफ्राइजने केला.
पहिल्या सत्रामध्ये दोन्ही संघांनी गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र कोणालाही यश आले नाही. दुसर्‍या सत्रात दोन्ही संघांमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली. सेकेण्ड हाफनंतर सातव्या मिनिटालाच म्हणजेच सामन्याच्या 52व्या मिनिटाला नेदरलँडने पहिला गोल आपल्या नावे केला. विझनालडमने हा गोल केला. त्यानंतर सहा मिनिटांनी म्हणजेच सामन्याच्या 58व्या मिनिटाला वेगॉर्टने गोलपोस्टचा वेध घेत नेदरलँडची आघाडी 2-0वर नेली. त्यानंतर सामना हातचा जाऊ नये म्हणून युक्रेनने आक्रमण अधिक वेगवान केले. नेदरलँडने 2-0ची आघाडी घेतल्यानंतर 17 मिनिटांनी म्हणजेच सामन्याच्या 75व्या मिनिटाला युक्रेनने आपला पहिला गोल झळकावला. युक्रेनच्या यारमोलन्कोने हा गोल झळकावला.
युक्रेनने पहिल्या गोलनंतर अवघ्या चौथ्या मिनिटाला म्हणजेच सामन्याच्या 79 मिनिटाला दुसरा गोल झळकावत 2-2ची बरोबर केली. सामन्याच्या शेवटच्या 11 मिनिटांमध्ये दोन्ही संघ विजयी गोल नोंदवण्यासाठी धडपड करताना दिसले. यामध्ये नेदरलँडचा संघ युक्रेनपेक्षा सरस ठरला. 2-2ची बरोबर अवघी सहा मिनिटे टिकली अन् नेदरलँडने 85व्या मिनिटाला तिसरा गोल नोंदवला. डमफ्राइजने हा निर्णायक गोल केला. सामन्यातील चुरस पाहून 90 मिनिटांचा खेळ झाल्यानंतरही दोन मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला होता, मात्र या वेळामध्येही युक्रेनला बरोबरी करण्याची संधी नेदरलँडने दिली नाही आणि यंदाच्या युरो कपमधील पहिलाच सामना त्यांनी खिशात घातला.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply