Breaking News

मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह; झिशान सिद्दिकींची भाई जगतापांविरोधात तक्रार

मुंबई ः प्रतिनिधी

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना काँग्रेसने मात्र आतापासूनच पुढील विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा नारा दिला आहे, तर अवघ्या वर्षभरातच मुंबईत महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसून कामाला सुरुवात केली आहे. असे असताना मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस दिसू लागली आहे. काँग्रेसचे वांद्रे पूर्वमधील आमदार झिशान सिद्दिकी यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षांविरुद्ध थेट पार्टी हायकमांड अर्थात पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यावर भाई जगताप यांनीही प्रत्युत्तर दिल्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत कलगीतुरा पाहायला मिळत आहे. भाई जगताप यांनी वर्षभरापूर्वीच मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेतला, मात्र वर्षभराच्या आतच त्यांच्या निर्णयांना मुंबईतूनच आव्हान दिले जाऊ लागले आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply