Monday , February 6 2023

धोनीचा नवा मिशीवाला लूक

शिमला ः वृत्तसंस्था
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण या वेळी क्रिकेटसाठी नव्हे, तर त्याच्या नव्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
धोनीने ऑगस्ट 2020मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. त्यानंतर तो बहुतेक वेळा शेतात किंवा कुटुंबीयांसोबत वेळ व्यतित करताना दिसला. धोनी सध्या त्याच्या नव्या लूकमुळे चर्चेत आला आहे.
धोनी सध्या पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबत शिमलामध्ये सुटीचा आनंद घेत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सध्या लॉकडाऊनच्या नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर धोनी त्याच्या कुटुंबीयांसह शिमल्यात पोहचला आहे. धोनी शिमल्यात आल्याचे कळाल्यानंतर काही फॅन्सही तिथे पोहचले आणि धोनीनेही त्यांना निराश केले नाही.
धोनीने चाहत्यांना स्वाक्षरी देत त्यांची दखल घेतली.
धोनीने शिमला येथे कुटुंबीयांसोबत काही फोटोदेखील टिपले आहेत. यात धोनीचा नवा लूक पाहायला मिळतोय. धोनीने ’सिंघम स्टाइल’ मिशी ठेवलीय. त्याच्या या हटके लूकची सोशल मीडियात जोरदार चर्चा होत आहे.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply