Breaking News

महापौर सहाय्यता निधीतून मदत मंजूर

पनवेल मनपा हद्दीतील दोघांना लाभ

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महापालिका हद्दीतील रहिवाशी असणार्‍यांना वैद्यकीय कारणासाठी महापौर निधीतून मदत देण्यात येते. सोमवारी (दि. 3) झालेल्या महापौर सहाय्यता निधी समितीच्या बैठकीत दोन लाभार्थ्यांना मदत मंजूर करण्यात आल्याची माहिती महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी दिली.

पनवेल महापालिकेच्या महापौर सहाय्यता निधी समितीची बैठक सोमवारी महापौर कार्यालया शेजारील सभागृहात महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष शेट्टी, माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, प्रभाग समिती सभापती सुशीला घरत, अनिता पाटील, हेमलता म्हात्रे, उपायुक्त सचिन पवार, मुख्य लेखाधिकारी गावडे आदी उपस्थित होते.

महापौर सहाय्यता निधीतून मदत मिळण्यासाठी दोन अर्ज आले होते. खारघर येथील रहिवाशी शंकर नामदेव वाघमारे यांना कॅन्सर संबंधित केमोथेरपीसाथी चार लाख खर्च येणार आहे. त्यांना नगरसेवक प्रवीण पाटील यांनी मदत देण्याची शिफारस केली होती. त्यानुसार वाघमारे यांना 25 हजार रुपये मंजूर करण्यात आले. घोटगाव येथील रहिवाशी अश्विनी किशोर निघूकर या अपघातग्रस्त तरुणीच्या मेंदूवर शस्त्रक्रिया किरण्यासाठी दोन लाख 52 हजार रुपये खर्च येणार आहे. तिला मदत करण्यासाठी नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील यांनी शिफारस केली होती. तिला 15 हजार रुपये मंजूर करण्यात आले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply