Breaking News

रायगडात भातलावणीला सुरुवात

अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात भातलावणीच्या कामाला आता सुरुवात झाली आहे. शेतामध्ये शेतकरी नांगरणी, रोपे खणणे आणि लागवड करताना दिसत आहेत. नांगरणीच्या कामात पारंपरिक बैलजोडीच्या नांगराचा वापर अद्यापही सुरू आहे.
जिल्ह्यात एक लाख 24 हजार 483 एवढे भात लागवडीचे क्षेत्र आहे. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात एक लाख 4 हजार 31  हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्याचे तसेच उत्पादकता हेक्टरी 2993 किलो ग्राम करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.
यंदा पाऊसही लवकर सुरू झाला. जून महिन्याच्या सुरवातीला चांगला पाऊस झाला. या वर्षी आतापर्यंत 818 मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली असून तो शेतीसाठी पोषक ठरला आहे. जिल्ह्याच्या काही भागांत  धूळपेरणी केली जाते. त्या ठिकाणी रोपांची वाढ चांगली झाली असून शेतामध्ये पाणीही साचले आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत लावणीची कामे लवकर सुरू झाली आहेत. दक्षिण रायगडमधील महाड, पोलादपूर, माणगाव तालुक्यांमध्ये भाताची लावणीच्या कामाला शेतकर्‍यांनी सुरुवात केली आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply