नवी दिल्ली ः जम्मू-काश्मीर पोलिसांनी रविवारी मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला. हल्ल्यासाठी आणलेली आयईडी स्फोटके पोलिसांनी जप्त केलीत. या प्रकरणी लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविवारी मध्यरात्री जम्मूतील एअर फोर्स स्टेशनवर ड्रोनहल्ला झाला. त्या पार्श्वभूमीवर आणखी एका मोठ्या हल्ल्याचा कट उधळून लावण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले. या घटनांमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. याबाबत जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग म्हणाले की, जम्मू पोलिसांनी ‘लष्कर’च्या दहशतवाद्यांनी आणलेली आयईडी स्फोटके जप्त केली आहेत. गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडविण्याचा त्यांचा डाव होता. नरवालमधून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याची चौकशी केली जात असून हल्ल्याच्या कटात सहभागी इतर संशयितांनाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …